Pune Police On Traffic Jam | मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे यंत्रणांना निर्देश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police On Traffic Jam | पुणे शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे शहर पोलीस (Pune City Police) आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिले. (Pune Police On Traffic Jam)

 

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police Commissionerate) काल (गुरुवारी) आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे (Pune Smart City) मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते (Chief Executive Officer Sanjay Kolte), पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar), पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महामेट्रो (Maha Metro), टाटा मेट्रो (Tata Metro), पी.एम.आर.डी.ए. (PMRDA), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD Pune), कटक मंडळ Pune Cantonment Board (PCB), पी.एम.पी.एम.एल.चे (PMPML) अधिकारी उपस्थित होते. (Pune Police On Traffic Jam)

 

या बैठकीमध्ये पुणे शहरामध्ये पावसाळ्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे व त्याचा राडारोडा रस्त्यावर असल्याने होणारी वाहतूक कोंडी, शहरात सुरु असलेली उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सुरु असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे आदींच्या अनुषंगाने उपाययोजनांविषयी विचारविनिमय करण्यात आला.

गटारे, नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे तसेच गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळी (स्टॉर्मवॉटर) पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वगैरे कामामुळे रस्त्यात पडलेला राडारोडा काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या.

 

पावसाळ्यामध्ये वाहतूक नियमानाकरीता पुणे मनपा Pune Municipal Corporation (PMC), महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेस (Pune Traffic Police) अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

 

आंबील ओढा, कोळेवाडी नाला, दळवी नगर चौक, आंबेगांव नाला, जांभुळवाडी नाला आदींच्या नालेसफाईबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
पीएमपीएमएल बसेस नादुरुस्त होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत असेही सांगण्यात आले.

 

अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात.
सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय रहावा याकरीता सर्व संबंधित स्वायत्त संस्थांच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष
तयार करण्यात येणार असून जलद प्रतिसादासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये तातडीने
संदेशाचे आदानप्रदान करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

 

Web Title :  Pune Police On Traffic Jam | In line with pre-monsoon preparations, a meeting was held at the
Pune Police Commissionerate; Directing the systems to complete the remedial works at the earliest to avoid traffic jams

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा