नवीन कात्रज बोगद्याजवळ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं ‘गुढ’ उकललं, ‘प्रेयसी’ करत होती ‘ब्लॅकमेल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोत्यात सापडलेल्या खुनाचे गुढ उकळण्यात पोलिसांना यश आले असून, पूर्वीची प्रियसी असणारी महिला आता पैशांची मागणी करून त्रास देत असल्याने खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारती विद्यपीठ पोलिसांनी 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

दीपक रावसाहेब सुकळे (25, रा. कापूरहोळ, ता. भोर, मूळ उस्मानाबाद) आणि साथीदार धर्मेंद्र तडसरे (38) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारास पकडण्यात आले आहे. सुनीता शेळके असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी नवीन कात्रज बोगद्याजवळील टेकडीवर एका पोत्यात अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला होता. याप्रकरणी भारती विद्यपीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान महिलेची ओळख ही पटविण्याचे काम सुरू होते. एक पथक महिलेचा फोटो घेऊन परिसरात फिरत असताना ती महिला गोसावी वस्ती येथील असून, तिचे नाव सुनीता शेळके (वय 40) असे असल्याचे समजले. त्यानुसार माहिती घेण्यात आली. यावेळी हर्षल शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दीपक याच्यासोबत प्रेम संबध असून, त्यांच्यात पैशावरून वाद सुरू होते असे समजले. यानंतर पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी हर्षल शिंदे व पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like