पुणे पोलिसांची विद्यालयीन प्रांगणात पहिल्यांदाच परेड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पोलिसांविषयी सौदार्हयाची भावना वाढीस लागण्यासाठी पुणे पोलिसांनी खडकीतील सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कुलच्या प्रांगणामध्ये कवायतीचे आयोजन केले होते. शुक्रवारी (दि.13) सकाळी साडेसात वाजता या परेडचे आयोजन करण्यात आले होते. एक तास चालेल्या या कवायतीची मानवंदना परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी स्विकारली.

आज झालेल्या परेडमध्ये येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, 6 पोलीस निरीक्षक, 9 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 88 पोलीस कर्मचारी आणि 12 बँडपथकातील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सेंट जोसेफ हायस्कुलमधील साधारण 2700 विद्यार्थी त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

अशा प्रकारच्या कवायत समारंभामुळे उद्याचे भविष्य असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रत्सोहान मिळून त्यांच्या मनात पोलीसांप्रती सौदार्हयाची भावना वाढीस लागण्यास मदत होईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like