Pune Police | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत; जाणून घ्या कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या पुणे पोलिसांच्या (Pune Police) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) कार्यरत असणारे पोलीस शिपाई रमेजराजा बाबाजी मुल्ला (Ramejaraja Babaji Mulla) यांना तडकाफडकी निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी काढले आहेत. (Pune Crime)

रमेजराजा मुल्ला यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक (Arrest) होऊ नये यासाठी त्यांनी न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज (Pre-Arrest Bail Application) केला होता. दरम्यानच्या काळात 19 फेब्रुवारी 2022 पासून मुल्ला हे विनापरवाना गैरहजर (Absent) राहिले होते. दाखल गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळाल्यानंतर रमेजराजा मुल्ला हे कर्तव्यावर हजर झाले. गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी मुल्ला कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच दाखल गुन्ह्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने पुणे पोलीस (Pune Police) दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रमेजराजा मुल्ला यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे. त्यामुळे पुणे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच मुख्यालय (Police Headquarter) सोडता येणार नाही. मुख्यालय सोडायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title :- Pune Police | Police personnel of Pune city police force suspended; Know the reason


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dilip Walse Patil – Azaan On Loudspeaker | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अजान ऐकू येताच केले असे काही; सर्व लोक पाहताच राहीले (Video)

MNS Corporator Vasant More | राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेच्या पुणे शहराध्यक्षांची मोठी भूमिका; नगरसवेक वसंत मोरे म्हणाले – ‘मला प्रभागात शांतता हवीय’

Stairs Workout | घराच्या पायर्‍यांवर ‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने सहज कमी करू शकता वजन; जाणून घ्या