कुटुंबीयांच्या उपस्थित पार पडला पोलिसांचा पदोन्नतीचा कार्यक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चोवीस तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना आपल्या कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण घालवता येत नाहीत. पोलिसांना पदोन्नती मिळाळ्यानंतर शासकीय पद्धतीने कार्य़क्रम घेऊन त्यांना पदोन्नत्ती देण्यात येते. मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी याला फाटा देत पोलिसांच्या पदोन्नत्ती कार्यक्रमामध्ये पोलिसांच्या कुटुंबीयांना सहभागी करून हा कार्य़क्रम साजरा केला. महाराष्ट्रात अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा पदोन्नती कार्य़क्रम घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आज पुणे आयुक्तालयात झालेल्या कार्य़क्रमात ११६ पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार यांना पोलीस नाईक ते सहायक पोलीस उपनिरीक्षक अशी पदोन्नती देण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर स्टार व फीत बांधण्याचा मान पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना दिला. आपल्या मुलाच्या, पतीच्या, वडिलांच्या खांद्यावर स्टार आणि फित बांधताना नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आई-वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी यांनी स्टार आणि फित लावताना कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून येत होता.

पदोन्नतीने कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचेही क्षण यावेत, कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबियांचा प्रधान्याने विचार करून सर्व आमिषांना दूर करत प्रामाणीक कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. यातुनच पोलीस दलाबद्दल सर्वसामान्य नागरीकांमध्ये आपुलकी व विश्वास वाढणार असल्याचे मत पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड