Pune Police | पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिस (Pune Police) आयुक्तालयाच्या स्वारगेट पोलिस ठाण्यातील (Swargate Police Station) पोलिस उपनिरीक्षकास तपास कामामध्ये हयगय करून टाळाटाळ केल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबीत (Suspended) करण्यात आले आहे. निलंबनाचा आदेश अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalinder Supekar) यांनी काढले आहेत. (Pune Police)

 

 

मालोजी बबन कांबळे (PSI Maloji Baban Kamble) असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक कांबळे हे स्वारगेट पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्याकडे गु.र.नं. 7/2022 प्रमाणे भादंवि कलम 304 (अ), 279, 427 मो.वा.का. कलम 184, 119/177 या प्रमाणे गुन्हयाचा तपास आहे. गुन्हयात तपास अधिकारी (Pune Police) असताना त्यांनी हयगड करून टाळाटाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्तव्यपरायणता राखली नाही तसेच हलगर्जीपणा व बेजबाबदारपणाचे वर्तन करून पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन केली म्हणून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. दि. 29 जानेवारी 2022 पासून पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांना निलंबीत करण्यात आले आहे. दरम्यान, उपनिरीक्षक कांबळे यांनी प्राथमिक / विभागीय चौकशी होणार आहे.

 

Web Title :- Pune Police | PSI Maloji Baban Kamble Suspended

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Flipkart Electronics Sale | 540 रुपयात खरेदी करा Oppo चा जबरदस्त फीचर्सचा 5G Smartphone

Bombay High Court | 7 वर्षाच्या प्रत्यक्ष साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा

Amruta Fadnavis | ‘…हरामखोर का मतलब…. है और सुनने मे आया है….नामर्द है’ ! अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या ‘नामर्द’? राजकीय वर्तुळात चर्चा