Pune Crime | पुण्यातील मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा ! 6 लाखांचा मुद्देमाल जप्त, 36 आरोपींविरुद्ध कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीतील आप्पा कुंभार (Appa Kumbhar) याच्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Department) पथकाने आज (शनिवार) पहाटे छापा टाकला. या कारवाई पोलिसांनी 6 लाख 08 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 36 जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई  मंगळवार पेठेतील ओम शांती टॉवर्स (Om Shanti Towers) येथे करण्यात आली. तळघरात बाहेरून कुलूप लावून आतमध्ये जुगार अड्डा (Pune Crime) सुरु होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास मंगळवार पेठेतील ओम शांती टॉवर्सच्य तळघरात असलेल्या जुगाराच्या क्लबमध्ये सुरू असलेल्या पत्त्यावरील व इतर जुगार, पैशावर गैरकारदेशीरीत्या खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पंचासमक्ष पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून जुगार मालक, जुगार खेळणारे, जुगार खेळवणारे व पाहीजे आरोपी असे एकुण 36 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (Maharashtra Gambling Prevention Act) कलम 4(अ), 5 व 12 (अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली. (Pune Crime)

जुगार अड्डा मालक विरेश भीमाशंकर कुंभार Viresh Bhimashankar Kumbhar (वय 39 रा. 42/2, मिथिला अपार्टमेंट्स, 7 वा मजला,  दशभुजा गणपतीचे पाठीमागे, पौड फाटा, पुणे) जुगार अड्ड्यावरील कामगार सुमीत नरेश भाटीया (वय 29 रा. खुशबू हॉटेल समोर, तोडकर गार्डन, ए विंग, 4 था मजला, रुम नं 405, बिबवेवाडी पुणे), दिपक सूभेदार परदेशी (वय 22  रा. 55/56, सोमवार पेठ,  सदानंद नगर, प्लॉट नं 4, पुणे), सोनू अर्जुनसिंग (वय 28 रा. मासोळी हॉटेलच्या बाजुला,  गाडीतळ, हडपसर, पुणे), सुरेश रूपना कुंभावत (वय 26 रा.156, मंगळवार पेठ, ओमशांती, लोअर फेज 3, पुणे),

 

अशोक भगवान वाघमारे (वय ५५ रा. जय प्रकाश नगर, दुर्गा माता मंदिराच्या मागे, येरवडा पुणे), धनाजी बाबुराव खाडे (वय ४६ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, सर्वे नं‌. १२, क्षिरसागर हॉल शेजारी, येरवडा, पुणे), श्रवण राम कुमावत (वय ३२ रा.११६, जनवाडी, गोखले नगर, पुणे), अरुण शिवनंदन सिह (वय ४३ रा. सम्राट नगर, २२४, बोपोडी, पुणे), राकेश रामशिंग ठाकुर (वय ३८ वर्षे, रा.शॉप नं २, ओम शांती बिल्डिंग, १५६, मंगळवार पेठ, पुणे)

जुगार खेळणारे खेळी
राहुल राजू कांबळे, वय ३२ वर्षे, रा. ३९४, मंगळवार पेठ,  पुणे), फैजान असिफ शेख (वय २७ रा. लोहियानगर, ५४,  एच पी गंज, पेठ पुणे), रवी अशोक देविया (वय ३२ रा. १७२, मंगळवार पेठ,  पुणे), बाळासाहेब विजय शेंडगे, (वय ३६ रा. २२७, मंगळवार पेठ, जुना बाजार, पुणे), फर्दीन अहेमद पटेल (वय २१ रा. लोहिया नगर, गंज पेठ, पुणे), महादेव अभिमान शिखरे (वय ३० वर्षे, रा‌ बिल्डिंग नं. १, रुम नं ४११, नेहरुनगर स्टेडियम जवळ, पिंपरी  चिंचवड,  पुणे), दिपक नवनाथ कांबळे )वय ३३ रा.११२२, भवानी पेठ गाडीअड्डा, खकसार मस्जिदचे समोर, पुणे), परशुराम चर्मकानी नाडार (वय ३१ रा.१०४३, बुधवार पेठ, ताज बिल्डिंग, ४था मजला,  पुणे), अजिम अब्दुल रहिमान शेख (वय ३३ रा. ५४, ए.पी. लोहियानगर, गंजपेठ, पुणे), निलेश लक्ष्मण सात (वय ४२ रा. ४१९, रास्तापेठ पुणे),

राजेश ज्ञानेश्वर निघोट वय ४३ रा.शिवणे, एन डी ए रोड, पोकळे नगर, पुणे), गणेश राजू खानविलकर (वय २७ रा.पहीली गल्ली, ५४, सिपी लोहिया नगर, पुणे), शिवराज मल्लेश जाधव (वय २५ रा.लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे), माणिक दत्तात्रय टपळे (वय ६८ रा.खंडोबा मंदीर, गल्ली नं ६, सुखसागर नगर, कोंढवा, पुणे), संजय धोंडिबा गोळे (वय ५४ रा. ३३३, मंगळवार पेठ, पुणे), अनिल हणमंत वीटकर, वय ३७ रा.लाल चाळ झोपडपट्टी, पुणे), आकाश शंकर माने (वय २९ रा.जनवाडी झोपडपट्टी,  गोखले नगर, पुणे), निखिल राजू कांबळे (वय २८ रा.३९४, नवी मंगळवार पेठ, पुणे),  निलेश सुरेश सोनवणे (वय ४० रा.विकासशील सोसायटी, केशव नगर, पुणे), विल्यम जॉन जोसेफ, वय ३३ रा.१८०, जुना बाजार,  खडकी, पुणे)

 

सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी
भिमाशंकर ऊर्फ आप्पा इरप्पा कुंभार Bhimashankar alias Appa Irappa Kumbhar (जुगार अड्डा मालक) (वय 68 वर्षे, रा. नवीन नानापेठ, 418, निवडुंगा मारुती मंदीराचे शेजारी, पुणे), स्थळांवरुन पळून गेलेले 5 अनोळखी आरोपी.

या कारवाईत आरोपींकडून व घटनास्थळावरुन एकुण  6 लाख 8 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये रोख 1 लाख 11 हजार 100 रुपये, तसेच 1 लाख 47 हजार रुपये किंमतीचे 29 मोबाईल व 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्य 6 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय जुगाराचे अन्य साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपींवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बाहेरुन टाळा, अन आत एसीत मजेशीर खेळा..!
समर्थ पोलीस ठाण्याचे हद्दीत आप्पा कुंभार या कुप्रसिद्ध व्यक्तीचे अवैध मटके, जुगार व पत्त्याच्या क्लबचे अवैध धंद्याचे साम्राज्य पसरलेले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी समर्थ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या, त्याचा जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यात आप्पा कुंभार पाहिजे आरोपी आहे. पण तरी देखील त्याचा जुगाराचा क्लब फॉर्म मध्ये सुरू होता. त्याचा जुगाराचा क्लब रात्री 11.30 ला सूरु होऊन पहाटे 4 पर्यंत सुरू असायचा. तळघरातील सुमारे 2000 स्क्वअर फुटांचा या जुगाराच्या क्लबमध्ये, एयर कंडीशन (Air conditioning), पंखे, इन्हर्टर, जुगार खेळायला मखमालीचे टेबल, खुर्च्या, लोखंडी स्टूल्स तैनात करण्यात आले होते.

खेळींना क्लबवर आणण्यासाठी खास सोय
खेळींना क्लबवर आणायला सोडायला, शुटर्समार्फत मोटारसायकल, स्कुटरची व्यवस्था केली होती. क्लबच्या चारही दिशांना, इमारतीच्या आजूबाजूला, नागझरी कडे ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरले होते. या सीसीटीव्हीचे कव्हरेज आप्पा कुंभार चे मोबाईल वर व राहत्या घरी दिसत असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाकडून होणाऱ्या रेकीची माहीती त्याला अन् त्याच्या मुलाला लगेच मिळायची, अन् क्लब मधील लोक नागझरी मार्गे पसार व्हायचे.

 

अलिशान सोई सुविधा
गेल्या काही आठवड्यांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून यावर लक्ष ठेवले जात होते. क्लब बंद आहे हे दाखवण्यासाठी मेन गेटवर कायमचे मोठ्ठे कुलूप लावले होते. फक्त रोजच्याच अन् परिचयाच्या खेळींना तेथे प्रवेश होता. एकदा का क्लब मध्ये प्रवेश केला की, आत जुगारा साठी सर्व अलिशान सोई सुविधा करण्यात आल्या होत्या. जुगारींना रात्री जुगार खेळताना बिसलेरी पाणी, चहा, कॉफी, क्रिमरोल व अन्य पदार्थ पुरवण्यासाठी विशेष रूम तयार करुन त्यात गॅस सिलिंडर व शेगडीचीही व्यवस्था करण्यात आली होती.

गणपतीच्या मूर्तीसमोर जुगार
तळघरात चालणाऱ्या या आलिशान जुगाराच्या क्लबमध्ये सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे, अन त्या गणपतीच्या समोर असलेल्या लोखंडी दानपेटीचा वापर, जुगाराचे पत्त्यांचे कॅट ठेवण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

परिसरातील शुटर्सची पोलिसांवर पाळत
गेल्या काही दिवसांपासून  सामाजिक सुरक्षा विभागाची या क्लबच्या हालचालींवर नजर होती व रेकी सुरू होती
पण आसपासच्या परिसरात तैनात केलेले शुटर्स (पोलीसांवर पाळत ठेवणारे) अन सीसीटीव्हीत टिपण्यात येणाऱ्या
हालचालींमुळे चाणाक्ष आप्पा कुंभार लागलीच सतर्क व्हायचा अन क्लबच्या आत बसलेल्या स्टाफला मोबाईल वर संदेश देऊन अलर्ट करायचा.
त्यानंतर क्लबमधील आतले लाईट बंद होऊन, जुगारी लोकांना, नागझरी मार्गे बाहेर काढले जायचे.

सीसीटीव्ही द्वारे क्लबवर पाळत
गेल्या काही काळापासून अवैध धंद्यावर  सामाजिक सुरक्षा विभागाकडून होत असलेल्या कारवाया लक्षात घेऊन,
आप्पा कुंभारने आपले खबरे नेमून, सामाजिक सुरक्षा विभागातील स्टाफ, वाहने यांची सविस्तर माहिती गोळा केली होती.
व चुकुनही सामाजिक सुरक्षा विभागाचे वाहन, स्टाफ समर्थ पोलीस ठाण्याचे परीसरात आले तरी त्यांची माहिती त्याला क्षणात मिळत होती.
विशेष म्हणजे आप्पा कुंभार हा स्वता क्लबमध्ये न थांबता, आसपासच्या परिसरात थांबून,
मोबाईल वरील सीसीटीव्ही सिस्टीम द्वारे जुगाराच्या क्लबवर अन पोलीसांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवत होता.

 

पैसे जप्त होऊ नये म्हणून घेतली होती ‘ही’ खबरदारी
पोलीसांची रेड अगदी झालीच, तर जास्त रक्कम जप्त होऊ नये यासाठी त्याचा मुलगा,
दर तासांने क्लबमध्ये जाऊन, गोळा झालेली रक्कम बाहेर घेऊन येत होता.
सामाजिक सुरक्षा विभागाकडून होणाऱ्या संभाव्य रेकीबाबत व कारवाई बाबत आप्पा कुंभारला त्याचे आतल्या व
बाहेरच्या खबऱ्यांचे नेटवर्क कडून वेळीच माहिती मिळत होती.
पण यावेळी पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी सामाजिक सुरक्षा विभागास अवैध कारवाईसाठी नव्या दमाचे पोलीस अधिकारी दिल्याने,
त्यांचा अंदाज न आल्याने, आप्पा कुंभारच्या जुगार क्लबवरचा छापा यशस्वी झाला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), पोलीस अंमलदार शिंदे, मोहीते, कांबळे,
यांच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार सदर कारवाईसाठी
परीविक्षाधिन पोलीस उप निरीक्षकांनी देखील आपला सहभाग नोंदवित आपली कामगिरी चोख बजावली आहे.

 

Web Title :- Pune Police | Pune Police Crime Branch Raids On Gambling Den Samarth Police Station Appa Kumbhar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepali Sayed On BJP | ‘एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही’; दिपाली सय्यद यांचा टोला

 

Pooja Chavan Suicide Case | ‘पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चीट द्या’, बंजारा महंतांची पुणे पोलिसांकडे मागणी

 

Pune Crime | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महिलेवर वार करून लुटले