Pune Police | पुणे पोलिसांनी तत्परता ! वाट चुकलेल्या 6 वर्षीय ‘अक्सा’ला केलं आईच्या स्वाधीनं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | बसमधुन आपली वाट चुकलेल्या एका 6 वर्षीय ‘मुकबधीर मुलीला पोलिस आणि पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही विलंब न करता तत्परतेने त्या मुलीला तीच्या कुटूंबाच्या स्वाधीन केलं आहे. मुलगी कुठून आली याची चौकशी करुन तीला सुखरुप तिच्या आईच्या स्वाधीनं करण्यात पोलिसांना (Pune Police) यश आलं.

आज गणेशोत्सवाच्या वातावरणात गर्दी आहे. कर्वेनगरहून हडपसर (Karvenagar to Hadapsar) मध्ये निघालेल्या बसमध्ये एक 6 वर्षाची मुलगी (6 year old girl) बसली. चालकाने (PMPL driver) चौकशी केली असता तीला बोलता येत नसल्याचे व तीच्याबरोबर देखील कोणीच नसल्याचे समजले. प्रसंगावधान राखून चालकाने कोथरुड बस स्थानकावर (Kothrud bus stand) पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांकडे या मुलीला सोपवत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
त्यांनतर तेथील कर्मचाऱ्यांनी 100 नंबरला फोन करुन याबाबत माहिती दिली.
तात्काळ एरंडवणा मार्शल ज्ञानेश्वर पांचाळ (Marshal Dnyaneshwar Panchal) व जयराम भोजने (Jayaram Bhojane) तेथे पोहचले.
मुलीला बोलता येत नसल्याने मुलीचा पत्ता शोधणे कठीण होते.

दरम्यान, बस कोठुन आली त्या परिसरातील ही मुलगी असावी असा विचार करत मार्शलनी पेट्रोलिंग सुरु केले असता एक महिला धायमोकलून रडत येताना दिसली.
चौकशी केली असता या महिलेचीच ही मुलगी असल्याचे निष्पन्न झाले.
कर्वेनगर मधील वडार वसाहत, साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या रहीनाज वसीम नायक (Rahinaj Wasim Nayak) यांनी आपली मुलगी अक्सा (Aqsa) हीला पाहताच मायेने कवटाळले.
त्यावेळी नायक कुंटूंबही पोहचले होते.
पीएमपीएलचे कर्मचारी व पोलिसांच्या तत्परतेमुळे आपली मुलगी परत मिळाली असं समाधान त्या मुलीच्या कुटूंबीयांनी म्हटले.

Web Titel :-  Pune Police | pune-police good work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 204 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Crime News | बिल्डर निशांत कदम हत्या प्रकरण : पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांच्या मुसक्या आवळल्या

Devendra Fadnavis | पोलिस निरीक्षकाची पत्रकारांवर आरेरावी, फडणवीस यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा (व्हिडिओ)