Pune Police | कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा रूट मार्च

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | पुण्यात कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणूक (Pune Kasba Peth Bypoll Election) होत आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांकडून प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या सभा आणि रॅली काढल्या जात आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येईल तस तसा प्रचाराला वेग येत आहे. पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पुणे पोलिसांनी (Pune Police) मंगळवारी (दि.14) कसबा पेठ मतदारसंघातून रुट मार्च (Route March) काढला.

निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. कसबा पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, रस्ता पेठ, बुधवार पेठ, सदाशिव पेठेतून पोलिसांनी (Pune Police) रुट मार्च केला. खबरदारीचा उपाय म्हणून मतदानादिवशी मतदारसंघात मद्यविक्रीवर बंदी करण्यात आली आहे. येत्या 26 फेब्रुवारीला कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.

पुणे पोलिसांनी केलेल्या रुट मार्चमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासंह, पोलीस दलातील विविध शाखा,
सशस्त्र पोलिसांनी सहभाग घेतला होता. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था (Law and Order)
अबाधित रहावी यासाठी पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. तसेच संवेदनशील भागात पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

Web Title :-Pune Police | Pune police route march in the background of Kasba Peth by-election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना