Pune Police | महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत पुणे पोलीस दलाला 7 सुवर्णपदकं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत (Maharashtra Police Shooting Competition) पुणे पोलिसांनी (Pune Police) रायफल आणि पिस्टल प्रकारात सात सुवर्णपदकांची कमाई केली आहे. राज्य राखीव बल गट क्र.1 वडाची वाडी शूटिंग रेंज येथे 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 18 घटकांनी सहभाग घेतला होता.

 

या स्पर्धेमध्ये रायफल स्पर्धेच्या (Rifle Competition) 5, पिस्टल फायर (Pistol Fire) 4 व एम पी 5 या फायर स्पर्धेत 4 प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पुणे शहर पोलीस दलातील पोलीस (Pune Police) अंमलदार राजेंद्र पाटील (Rajendra Patil) यांनी 5 सुवर्ण (Gold Medal) व 1 कांस्यपदक (Bronze Medal), तर बेस्ट एम पी 5 शूटर आणि बेस्ट पिस्टल शूटर ट्रॉफीमध्ये पोलीस अंमलदार महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी रायफल 300 गज प्रोन पोझिशन फायर प्रकारात 1 सुवर्णपदक, एम पी 5 फायर प्रकारात रजत पदक (Silver Medal) पटकाविले. तसेच पोलीस अंमलदार अमोल नेवसे (Amol Nevse) यांनी रायफल 300 मीटर थ्री पोझिशन फायर प्रकारात एक सुपर्णपदक, सहायक पोलीस फौजदार नितीन शिंदे (Nitin Shinde) यांनी रायफल 300 गज प्रोन प्रकारात एक कांस्यपदक मिळवले.

पुणे पोलीस दलाने 7 सुवर्ण, 1 रजत व 3 कांस्यपदक प्राप्त केली. या सर्व स्पर्धकांची निवड जानेवारी 2023 मध्ये तामिळनाडूत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत (All India Police Shooting Competition) झाली आहे.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Administration Dr. Jalandar Supekar),
पोलीस उपायुक्त मुख्यालय यांनी विजेत्या खेळूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Web Title :- Pune Police | pune police won seven gold medal in shooting competition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा