Pune Police | पुण्यातील कोंढव्यात वाहतूक पोलिस निखिल नागवडेंनी केलं ‘हे’ काम, होतंय ‘कौतुक’ (व्हिडिओ)

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीला अडळा निर्माण होण्याच्या घटना पुण्यात नेहमीच पहायला मिळतात. परंतु पुणे पोलिसाकडून (Pune Police) वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळतात. अशीच एक घटना पुण्यात घडली असून या घटनेमुळे पुणे पोलीस (Pune Police) दलातील वाहतूक शाखेत (Traffic Branch) कार्यरत असणाऱ्या एका पोलिसाचे सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे. कोंढव्यातील वाहतूक कर्मचाऱ्याने (kondhwa traffic branch) ड्रेनेज लाइनमध्ये हात घालून कचरा काढून पाण्याला वाट मोकळी करुन देत वाहतूक सुरळीत केली. निखिल नागवडे (Nikhil Nagwade) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पुणे शहरामध्ये गुरुवारी पाऊस (Pune Rain) पडल्याने लुल्लानगर चौकात पाण्याचे तळे साचले होते. त्यातच गणपतीचे आगमन असल्याने वाहतूक खूपच मंदावली होती. साचलेल्या पाण्यातून लोकांना आपल्या गणपती बाप्पाला घेऊन मार्गस्थ होता येत नव्हते. पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic jam) झाली होती. त्यावेळी कोंढवा वाहतूक शाखेने पोलीस कर्मचारी निखिल नागवड यांची ड्युटी लावली होती.

चौकात साठलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या परिस्थितीचा अंदाज घेऊन नागवडे यांनी ड्रेनेज लाइनमध्ये (drainage line) हात घालून साचलेला कचरा बाजूला काढला. त्यामुळे साचलेले पाणी वेगाने वाहून गेल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली. साचलेले पाणी ड्रेनेजमध्ये घालवण्यासाठी नागवडे यांच्या कसरतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल झाला.

निखिल नागवडे यांनी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation)
कर्मचाऱ्यांची वाट न पाहता स्वत: पुढाकार घेत ड्रेनेज लाइनमधून कचरा बाहेर काढून पाण्याचा निचरा करण्यास प्राधान्य दिले.
त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे.
पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे (DCP Rahul Shrirame),
कोंढवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonawane),
सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे (API Lekhaji Shinde) यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Web Titel :- Pune Police | pune traffic police done good work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ICAI CA Result 2021 | सीए परीक्षेचा निकाल जाहीर, देशात नंदिनी अगरवाल पहिली

Hasan Mushrif | ‘…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले’

Beed Crime | संतापजनक ! पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या