Pune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट बुकी ताब्यात, 1 कोटी जप्त

सट्टा'किंग' 'गणेश भुतडा' अन् 'अशोक देहूरोडकर' ताब्यात, अनेक 'व्हाईट कॉलर' पोलिसांच्या रडारवर

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – पुणे शहर पोलिसांनी आज (रविवार) एक मोठी कारवाई (Pune Police Raid) करत दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना (internation cricket bookies) ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रूपयांवर अधिकची रोकड जप्त केली आहे. या कारवाई दरम्यान, सट्टाकिंग गणेश भुतडा (Ganesh Bhutada) आणि अशोक देहूरोडकर (Ashok Dehurodkar) या दोघांना पोलिसांनी (Pune Police Raid) ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.

गणेश भुतडा हा देशातील एक बडा क्रिकेट बुकी म्हणून ओळखला जातो अशी माहिती समोर आली आहे तर अशोक देहुरोडकर हा देखील महाराष्ट्रातील खुप मोठा बुकी आहे. समर्थ (Samarth Police Station)आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात (Marketyard Police Station) दोघांविरूध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यात मोठया प्रमाणावर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर क्रिकेट बेटींग सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. सुरू असलेल्या क्रिकेट बेटींगवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिले होते.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve), गुन्हे शाखेच्या प्रभारी अप्पर आयुक्त भाग्यश्री नवटके (IPS bhagyashree navtake), झोन -1 च्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे (ips priyanka narnaware), गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (dcp shrinivas ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch) तसेच इतर वेगवेगळया पथकांनी आज (रविवार) मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली. पोलिसांनी गणेश भुतडा आणि अशोक देहुरोडकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रूपयांची रोकड जप्त केली आहे. गणेश भुतडा आणि देहुरोडकर यांच्याकडील डायर्‍या, मोबाईल आणि इतर काही ‘कागदे’ पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामध्ये अनेकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर त्यांना वेळोवेळी मदत करणार्‍यांची कुंडलीच पोलिसांना मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपास सुरू असून त्याबाबत नंतर सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गणेश भुतडा आणि अशोक देहुरोडकर यांना ताब्यात घेतल्याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड,
लोणावळा आणि मुंबईतील काही मोठे बुक्की परागंदा झाल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, भुतडा आणि देहुरोडकर यांचे कोणा-कोणाशी संबंध आहेत याबाबत देखील माहिती काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Police Raid | Big action by Pune police! 2 big international cricket bookies detained, 1 crore seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock Tips | तीन महिन्यात 1 लाख रुपये झाले 15 लाख रुपये, ‘या’ स्टॉकने केली कमाल; जाणून घ्या

Sanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला (व्हिडीओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी