पुण्यात लॉकडाऊनमध्ये हडपसर परिसरात ‘जुगार’, पोलिसांकडून 6 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संचारबंदी असताना देखील तीनपत्ती जुगार खेळणाऱ्यावर हडपसर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सहा जणांना पकडण्यात आले आहे. तसेच साडे सहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे.

याप्रकरणी रामदास बाबासाहेब कांबळे, संजय शिवाजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर राजेंद्र कामठे, विनायक यशवंत अलाहाबादे, नारायण गणा ढावरे, यशवंत अरुण बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे शहरात संचारबंदी सुरू आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. तर एकत्र जमण्यास देखील बंदी आहे. परंतु संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून हडपसरमध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रामदास, संजय, विनायक, नारायण, यशवंत, ज्ञानेश्वर यांना तिनपत्ती जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. ही कामगिरी हडपसर पोलिसांनी केली.