हडपसर परिसरात ओपन ग्राऊंडवर खेळल्या जाणाऱ्या मटक्याच्या धंद्यावर गुन्हे शाखेचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरात ओपन ग्राऊंडवर खेळल्या जाणाऱ्या मटक्याच्या जुगारावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला आहे. येथून 1 लाख 67 हजार रुपयांची रोकड आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात कडक निर्बंध लागू आहेत.

सर्व अस्थपणा बंद आहेत. मात्र त्यानंतरही हडपसरमधील मंत्री मार्केटजवळ मोकळ्या मैदानात मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. या माहितीची खातरजमा करत सामाजिक सुरक्षा विभागाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी येथे मटक्याचा जुगार सुरू असल्याचे समोर आले.

येथून पोलिसांनी 1 लाख 67 हजार रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.