पुण्यातील ‘मसाज सेंटर’मध्ये भलतेच ‘उद्योग’, पोलिसांची ‘रेड’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरमॅक्स चौकात असलेल्या सुमन मॉल मधील शृष्ठी मसाज सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफार्स गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केला. पोलिसानी छापा टाकून मुलींची सुटका केली आणि दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार उषा दळे यांनी फिर्याद दिली आहे. तर शॉम्पा कोशिक घोष (३४, रा . मारुंजी) आणि अभिजित शिंगोटे पाटील (रा. डांगे चौक) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थरमॅक्स चौकातील सुमन मॉल मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या सिटी शृष्ठी मसाज सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मुलींची सुटका करुन गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही शहरात मसाज सेंटर वर कारवाई झालेली आहे. शहरात आजही अनेक मसाज सेंटर मध्ये मसजच्या नावाखाली गोरख धंदा सुरु आहे, मात्र संबंधित पोलीस त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.