कोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, पोलिसांकडून पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनआयबीएम रस्त्यावर सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायवर पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. येथून तबल 6 मुलींची सुटका करण्यात आली आहे.

स्वरुप रवी सबळ (वय २८, रा. वडगाव शेरी, फ्लॅटमालक इंदू व्ही. दुबे रा. कोंढवा, पूनम जहांगीर रा. वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावरील ला बेला स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री केली. त्यानंतर याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी येथून 6 मुलींची सुटका करण्यात आली.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या पथकाने केली.

You might also like