Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) फसवणूक व अपहार प्रकरणात BHR Case पुणे पोलीस (Pune Police) दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी जळगाव, जामनेर, भुसावळ येथे पुन्हा एकदा मोठी कारवाई करुन अनेकांची धरपकड करण्यात आल्याचे समजते. तसेच अमळनेर तालुक्यातील पाळधी गावातही छापा घातला आहे.
पुणे पोलिसांनी (Pune Police) आज सकाळी ६ वाजता अचानक एकाचवेळी चार ठिकाणी छापे घातले असून शहरात त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील मद्य व्यावसायिक भागवत भंगाळे यांना तर ते सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन नजिकच्या पोलीस ठाण्यात नेले.
त्याचवेळी जामनेर येथे पंचायत समितीच्या माजी सभापती यांना ताब्यात घेतले आहे.
जळगाव, भुसावळ, अमळनेर, पाळधी येथून अनेकांना ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथील पोलीस ठाण्यात बसविले आहे.
त्यांच्याकडे चौकशी सुरु करण्यात आली असून ही कारवाई दिवसभर चालण्याची शक्यता आहे.

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात २ पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २५ निरीक्षक, १०० कर्मचारी असा फौजफाट्यासह जळगाव मध्ये एकाचवेळी अनेक ठिकाणी कारवाई केली होती.
त्यातून बीएचआर पतसंस्थेमधील घोटाळ्यातील अनेक जणांना पकडण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे हस्तगत करण्यात आली होती.
त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात अनेक वेळा कारवाई केली आहे.
नोव्हेंबर प्रमाणेच आज पुन्हा एकदा मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Pune police raids in jalgaon regarding BHR case

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत