Pune : सराईताकडून पिस्तूलासह काडतुस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व काडतुस जप्त केले आहे.
मुकेश प्रल्हाद कांबळे (वय २२, रा. दिघीगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

मुकेश हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मारामारीसह खूनाचा प्रयत्न आणि जागेच्या वादासंदर्भात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सराईत शिवणे परिसरात असल्याची माहिती पोलीस नाईक अतुल साठे आणि संतोष क्षीरसागर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुकेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूलासह एक काडतुस जप्त करण्यात आले.

पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, दत्तात्रय गरुड, दीपक मते, अनिल शिंदे, संतोष क्षीरसागर, अतुल साठे, प्रवीण तापकीर, गजानन गाणबोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.