Pune Police Recruitment | पुणे पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी ‘या’ दिवशी होणार लेखी परीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Police Recruitment | येथील पोलीस आयुक्तालयातील रिक्त पोलीस शिपाई पदासाठी (२०१९) ५ ऑक्टोबरला लेखी परीक्षा (Pune Police Recruitment) होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना २२ सप्टेंबरपासून हॉल तिकीट देण्यात येणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच लेखी परीक्षा आधी तीही खासगी यंत्रणेच्या माध्यमातून होत आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) व अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर (Addl CP Jalinder Supekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही परीक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. ५ ऑक्टोबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी ई मेलवर उमेदवारांना २२ सप्टेंबरपासून हॉल तिकीट देण्यात येणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही, बायोमेट्रीक सुविधा, व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून शहरातील १४३ केंद्रांवर ही परीक्षा होईल. तसे कंपनीकडून नियोजन करण्यात आले आहे. परीक्षाकेंद्रावर २१९८ ब्लॉक तयार केले असून प्रत्येक ब्लॉकमध्ये २४ विद्यार्थ्यांची क्षमता राहणार आहे.

२०१९ मध्ये पोलीस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या २१४ पोलीस शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यासाठी ३९ हजार ३२३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कोरोना संकटामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

असे करावे लागणार हॉल तिकीट डाऊनलोड

२२ सप्टेंबरपासून उमेदवारांना हॉलतिकीट देण्यात येणार आहे.
हॉल तिकीटची लिंक उमेदवरांना त्यांच्या रजिस्टर इमेलवर पाठवली जाईल. तसेच,
https:// mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone
या लिंकवर युझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतो. त्याबरोबरच https:// mahapclicerc.mahaitexam.in/Phaseone
याच लिंकवर डाउनलोड हॉल तिकीट या बटनावर क्लिक करून हॉलतिकीट डाउनलोड करा.
याशिवाय अँपलिकेशन आयडी, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख अर्जात भरल्याप्रमाणे टाकून हॉल तिकीट मिळवता येईल.
दरम्यान हॉल तिकीट संदर्भात कोणाला काही अडचण आल्यास ९६९९७९२२३०, ८९९९७८३७२८, ०२०-२६१२२८८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त गुप्तता यांनी केले आहे.

Web Title : Pune Police Recruitment | pune police commissionerate
office costable written test on 5th october cp amitabh gupta give information

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा जास्तच्या टॅक्स चोरीत सहभाग – प्राप्तीकर विभाग

Maharashtra Rains | विकेंडपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट

Pune Crime | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना