वर्षात 3 हजारांहून अधिक बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विरूद्ध दिशेने वाहने दामटणार्‍या तब्बल तीन हजारहून अधिक बेशिस्तांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेनुसार थेट गुन्हे दाखलकरून कारवाईचा दणका दिला आहे. त्यानंतरही मात्र, बेशिस्तांची संख्या कमी झालेली नसून, रात्री तसेच सहानंतर या बेशिस्त वाहन चालक तर चांगलाच राडा घालतात. बेशिस्तांमुळे मात्र अपघाताला निमंत्रण मिळत असून, निष्पांचा जीव जात आहे.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारणकरत आहे. अनेकप्रयत्नानंतर वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग घेत नाही. त्यात बेशिस्त वाहन चालकांमुळे तर आणखीच भर पडते. त्यातही या बेशिस्तांमुळे अपघाताला निमंत्रण मिळते. काही

महिन्यांपुर्वी कोथरूड परिसरात विरूद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे एका पाठिमागून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला होता. बहुंताश अपघात हे बेशिस्त चालकांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच नियम भंग करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे (नो एंट्री), बेदरक वाहने चालविण्या यामुळे वाहन चालक स्वतसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण करतात. याला चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी वाहतूक पोलिसांना कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या.

कडक कारवाईशिवाय या बेशिस्तांना लगाम लागत नाही. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली. यंदाच्या वर्षात आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त वाहनचालकां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

हेल्मेट परिधान करणे, वाहतुकीचे नियम पाळा, पादचारी पट्टयांवर (झेब्रा क्रॉसिंग) वाहने उभी करु नका, भरधाव वाहने चालवू नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी मोहीम राबविली. मात्र, भरधाव वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी भादंवि 279 नुसार थेट दखलपात्र गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली.

डिसेंबर महिन्यात विरुद्ध दिशेने वाहने चालविणार्‍या वाहनचालकां विरोधात कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत विरुद्ध दिशेने वाहने चालविणार्‍या 832 वाहनचालकां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर, त्यापुर्वी 2 हजार 400 जणांवर कारवाई करण्यात आली होती. वर्षात वाहतूक विभागाने 3 हजाराहून अधिक वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/