Lockdown : पुण्यात ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान बिबवेवाडीत 11 लाखांची गावठी दारू जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन –  संचारबंदी असताना देखील बिबवेवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून तबल 11 लाख रुपयांची गावठी दारू पकडली आहे. महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मीनाक्षी धर्मेंद्र चौहाण (वय 35) आणि नागबती सवालसिंग राठोड (वय 35) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकातील रुपाली कर्णवर यांनी फिर्याद दिली आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे.

शहरात पोलिसांची गस्त सुरू आहे. बाहेर पढणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना मिनाक्षी नावाची महिला चोरून गावठी दारू विकत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यांनतर उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी गरुड, मगर, काळभोर, कोकरे व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी येथे महिला सुरू विकत असल्याचे दिसून आढळून आले. तिला ताब्यात घेण्यात आले. यावेळी येथून पोलिसांनी दारूचे कॅन, लागणारे साहित्य असा 11 लाख 700 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.