‘लॉकडाऊन’मध्येही पुणे पोलिसांनी केलं मोठं काम, 58 लाख नागरिकांना दिले परत मिळवून

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  सायबर चोरट्यानी पळविलेले 58 लाख नागरिकांना परत मिळवून देण्यात पुणे पोलिसांच्या सायबर शाखेला यश आले आहे. संचारबंदीत देखील पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

देश कोरोनामुळे आहे. या कालावधीत सायबर चोरटे ऍक्टिव्ह झाले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून पैसे पळविले जात आहेत. नोकरीचे आमिष, परदेशातून वस्तू पाठविने, सोशल मिडियाद्वारे ओळखकरून पसविले जात आहे. सुशिक्षित व्यक्तीच बळी पडत आहेत.

२३ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान शहरात १४१ तक्रादाराची ५८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर पोलिसांकडून टाळेबंदीत गुन्ह््यांचा तपास करत होते. यावेळी पोलिसांनी या गुन्ह्यातील 58 लाख रुपये यातील तक्रारदार याना परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे सर्व सामान्यना दिलासा मिळाला आहे. त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी सायबर गुन्ह््यांमध्ये पोलिसांनी एक कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला होता. तक्रारदारांचे पैसे ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आले होते. सायबर चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे लांबविल्यानंतर संबंधित बँकांकडे पाठपुरावा करण्यात आला होता.