Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी (Gang of Child Abductors) पुणे आणि परिसरात सक्रीय झाली आहे, असे खोटे मेसेज (Fake Messages) सोशल मीडियावर (Social Media) पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. ही एक अफवा असून नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police) केले आहे. तसेच अशा प्रकराच्या खोट्या माहितीद्वारे अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात येईल असा इशारा देखील पुणे पोलिसांनी (Pune Police) दिला आहे.

मागील दोन दिवसांपासुन सोशल मीडियावर काही विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल केले जात आहेत.
त्यांना शाळेतुन पळवून, अपहरण (Kidnapping) करुन नेले आहे अशा अफवा पसरविल्या जात आहेत.
मात्र यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. अशा प्रकरारची कोणतीही घटना पुणे शहरात घडलेली नाही,
तरी पालकांनी अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये. असा प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष
(Police Control Room किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी (Police Station) संपर्क साधून घटनेची शहनिशा करावी असे आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police) केले आहे.

तसे अशा प्रकारची माहिती, संदेश, ऑडिओ, व्हिडिओ क्लीप, फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केले तर
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांना अशा प्रकारचा संदेश मिळाल्यास त्यांनी खात्री केल्याशिवाय तो पुढे पाठवू नयेत असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title :-  Pune Police | Rumors of child abduction gang active in Pune, legal action will be taken against those spreading false information – Pune Police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ankita Bhandari | Facebook फ्रेंडमुळे उलघडले अंकिता भंडारीच्या हत्येचे रहस्य

Sugar Control Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी करावे डाळिंबाचे सेवन, जाणून घ्या फायदे आणि करावा वापर