Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा (Pune Crime Branch) आणि 14 पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी कारवाई करुन 42 पिस्तुले 74 जिवंत काडतुसे असा एकूण 12 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 28 आरोपींना अटक केली आहे.

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने 21 मार्च रोजी केलेल्या कारवाईत प्रशांत मगम पवार (वय-28 रा. सिंहगड रोड) याच्याकडून एक पिस्टल व दोन काडतुसे व एक किया कंपनीची कार जप्त केली. तर मेघराज उर्फ पप्पु लक्ष्मण दराडे (वय-32 रा. अहमदनगर) याच्याकडून 4 पिस्टल व 10 काडतुसे, समीर हरिभाऊ हरपुडे (वय-32 रा. कोथरुड) याच्याकडून एक पिस्टल असा एकूण 19 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर यापूर्वी अपहरण, खंडणी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तसेच 14 एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत तडीपार गुन्हेगार निखील राजु शिरसाठ (वय-21 रा. धायरी) याला अटक करुन 6 पिस्टल, 10 कडतुसे, मोपेड, कोयता असा एकूण 2 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 15 एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत तडीपार गुन्हेगार अश्विन बाळकृष्ण लोणारे (वय-20 रा. धाडरी) याला अटक करुन 3 पिस्टल 6 काडतुसे जप्त केली. तर वैभव अनंता तरडे (वय-23 रा. धायरी) याच्याकडून 3 पिस्टल 6 काडतुसे असा एकूण 2 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

22 मार्च रोजी खंडणी विरोधी पथक एकने सुरज रोहिदास खंडागळे (वय-30 रा. वारजे) याला अटक करुन एक पिस्टल व दोन काडतुसे असा एकूण 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 29 मार्च रोजी केलेल्या कारवाईत सागर गणेश सुतार (वय-23 रा. वारजे) याला अटक करुन एक पिस्टल व दोन काडतुसे असा एकूण 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

1 एप्रिल रोजी खंडणी विरोधी पथक दोनने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन 5 पिस्टल 11 काडतुसे जप्त केली. तसेच 9 एप्रिल रोजी अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (वय-31 रा. कोंढवा बुद्रुक) याला अटक करुन एक पिस्टल, तीन काडतुस असा एकूण 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. युनिट दोनच्या पथकाने 4 एप्रिल रोजी ओमकार विनोद पवार (वय-25 रा. अपर बिबवेवाडी) याला ताब्यात घेऊन एक पिस्टल व दोन काडतुसे असा एकूण 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 9 गुन्हे दाखल करुन 14 आरोपींकडून 28 पिस्टल व 54 जिवंत काडतुसे जप्त करुन 10 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 14 पोलीस स्टेशनने 10 गुन्हे दाखल करुन 14 आरोपींना अटक करुन 14 पिस्टल 20 काडतुसे असा एकूण 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, (Pune CP Amitesh Kumar) सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार (Pravin Pawar IPS), अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (Amol Zende DCP), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुनिल तांबे (Sunil Tambe ACP), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 सतिस गोवेकर (Satish Govekar ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (PI Pratap Mankar), श्रीहरी बहीरट (PI Shrihari Bahirat), क्रांतीकुमार पाटील (PI Krantikumar Patil), नंदकुमार बिडवई (PI Nandkumar Bidwai), गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, कानिफनाथ कारखेले, महेंद्र कडू, संतोष क्षीरसागर, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, विनोद शिवले, अकबर शेख, उज्ज्वल मोकाशी यांच्यासह व 14 पोलीस ठाण्यातील अधिकारी वर पोलीस अंमलदार यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू