‘सोशल’वर कारवाई ! कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून 250 WhatsApp ग्रुप अडमिन्सला नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी खरबदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पुणे पोलिसांकडून २५० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया ग्रुपवर अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही पोस्ट व्हायरल करू नका, अशी सक्त ताकीद पुणे पोलिसांची संबंधीत ग्रुप अ‍ॅडमिन्सना दिली आहे. तसेच तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी व हिंदू एकता आघाडीचे मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिलिंद एकबोटे हे भीमा-कोरेगाव दंगलीतील आरोपी असून ते सध्या जामिनावर आहे. या घटनेनंतर या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. १६३ लोकांना कोरेगाव भीमा गाव बंदी जाहीर केली होती.

पुणे-ग्रामीणचे अतिरिक्त एसपी जयंत मीना यांनी सांगितले की, भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून २५० हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीस पाठवण्यात आले आहेत. ग्रुप्सना समाजाच्या भावना दुखावणार नाही, अशा पोस्ट ग्रुपवर टाकू नये, असा इशारा देण्यात आला आहे. ग्रुप अ‍ॅडमिन्सना सेटिंग्ज बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन मेसेजेसचे नियमन करता येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/