Pune Police | धक्कादायक ! पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर (Pune Police) पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell) प्रभारी म्हणून काम पहात होत्या. आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

 

गुन्हे शाखेत नेमणुक होण्यापुर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर (Pune Police) पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. पुणे शहर पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानं शहर पोलिस दलासह संपुर्ण राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

 

शिल्पा चव्हाण यांनी विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर (Shantinagar, Vishrantwadi) भागात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Pune Police | Shocking! Suicide of a female Police Inspector Shilpa Chavan in Pune police force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

Corporator Archana Tushar Patil | प्रभागात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरु करा; भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांची
मागणी

Pune Crime | हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण, पुण्याच्या कोथरूड परिसरातील हॉटेल स्पाईस गार्डनमधील घटना

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

 

Pune Crime | पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस ! कोयत्याने वार करुन तरुणाच्या खूनाचा प्रयत्न, येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना