कौतुकास्पद ! सलग दुसऱ्या वर्षी फिक्कीच्या पारितोषिकावर पुणे पोलिसांची मोहर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे पोलीस नागरिकांकरीता वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. आता त्यांच्या आशाचा एका उपक्रमाची दाखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे पोलिसांनी सुरु केलेल्या विविध उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून नवी दिल्ली येथील फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने स्मार्ट पोलिसिंग अ‍ॅवार्ड २०१८ अंतर्गत ज्येष्ठांची सुरक्षिताचे पारितोषिक ज्येष्ठ नागरिक कक्षाला देण्यात आले़. सलग दुसऱ्या वर्षी फिक्कीच्या पारितोषिकावर पुणे पोलीस आयुक्तालयाने नाव कोरले आहे़. यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयास स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत बडी कॉप या उपक्रमासाठी फिक्कीचे पारितोषिक मिळाले होते़.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नवी दिल्ली येथे ३० व ३१ मे दरम्यान झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या हस्ते गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी हे पारितोषिक स्वीकारले़ देशभरातून आलेल्या २११ प्रवेशिकांमधून पुणे व नाशिक या राज्यातील दोन आयुक्तालयाच्या प्रवेशिकांचे नामांकन करण्यात आले होते़ नाशिकची प्रवेशिका स्मार्ट पोलिसिंगची होती़ तर पुणे पोलिसांची ज्येष्ठांची सुरक्षितता हा विषयावर होती़

याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, पुणे पोलीस दलाच्या वतीने विशेष ज्येष्ठ नागरिक कक्ष सुरु करण्यात आला आहे़. या कक्षाद्वारे शहरातील ज्येष्ठांना ओळखपत्र देणे, त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरु करणे, कुटुंबात दुरावा न येऊ देता तसेच न्यायालयीन कारवाई न करता त्यांच्या समेट घडवून आणणे, त्यासाठी आवश्यक समुपदेशन करणे अशा ज्येष्ठ नागरिकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या  उपक्रमातील वेगळेपणामुळे पारितोषिक मिळण्यास सहाय्यक ठरले आहे़  या ज्येष्ठ नागरिक कक्षात पोलीस निरीक्षक स्वाती थोरात, सहायक फौजदार बोराडे, अलका शिंदे, कांबळे, जयश्री जाधव, रिना स्वामी, खोडके, आशा गायकवाड, चाबुकस्वार, पूनम बारसकर, गजानन सोनवळकर हे काम पहात असतात़.

केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या हस्ते गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी हे पारितोषिक स्वीकारले़