पुणे पोलिसाचं ऑलआऊट ऑपरेशन, 200 हून अधिक जणांवर कारवाई तर 600 व्यक्तींना नोटीसा, 641 वाहने जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – संचारबंदीत देखील विनाकारण फिरणाऱ्यावर आज पुणे पोलिसांनी “ऑल आऊट” मोहीम उघडून धडक कारवाई केली. मॉर्निंग वॉकसह दिवसभरात 200 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेची सर्व पथक आणि स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. तर साडे सहाशे वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुण्यात वाहने रस्त्यावर आणण्यास मनाई केली आहे. शहरात रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. शहरातील 28 भाग सील करण्यात आले आहेत. मात्र या परिस्थितीत देखील अनेकजण विनाकारण बाहेर फिरत आहेत. अद्यापही नागरिकांना याचे गांभीर्य समजलेले नसल्याचेच दिसत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून कारवाई करत आहेत. मात्र त्यानंतर देखील नागरिक मॉर्निंग वॉक आणि विनाकारण वेगवेगळी कारणे काढून बाहेर फिरत आहेत.

गुरुवारी पुणे पोलिसांनी “ऑलआऊट” मिशन सुरू केले. सकाळी 8 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत गुन्हे शाखेच्या 5 अधिकारी आणि 80 कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागात नाकाबंदी करून कारवाई केली. यात पोलिसांनी 139 जणांवर कारवाई केली आहे. तर दिवसभरात 188 नुसार 101 गुन्हे दाखल केले आहेत. तर एकूण 641 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच 599 जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. ही कारवाई आणखी वाढविण्यात येणार असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.