पुणे पोलीस दलातील उपनिरीक्षकास ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 22 जण बाधित

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असताना पोलिसांचा देखील आकडा वाढत असून, पुणे पोलीस दलातील एका उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील आकडा 22 वर गेला आहे. तर 10 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. 4 हजाराच्या जवळ पोहचली आहे. आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस दल काम करत आहे. शहरात कोरोनाचे हॉटस्पॉट भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान परिमंडळ तीन मधील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. शनिवारी त्यांचे चाचणी घेण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपनिरीक्षक यांच्या कुटुंबाची देखील चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच संपर्कात अलेल्याचे तपासणी करण्यात येईल. सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान सुरवातीला मध्य वस्तीमधील पोलिस ठाण्यात कोरोनाने प्रवेश केला होता. यानंतर हा आकडा वाढत जात असल्याचे दिसत आहे. शहर पोलिस दलातील आकडा 22 वर गेला आहे. त्यात 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे शहरातील कर्मचारी तसेच क्वारंटाईन व कोरोना झालेल्या कर्मचारी यांची काळजी घेणे, त्यांना उपचार तसेच लागेल ती मदत करण्यात येत आहे.