Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे, पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना काळात कर्तव्य पार पाडत असताना पुणे पोलीस शहर दलातील (Pune Police) अनेक अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. पुणे पोलीस शहर दलातील (Pune Police) 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला कार्यभार दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश बुधवारी (दि.26) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve) यांनी काढले आहेत.

ज्या अधिकाऱ्यांवर कोरोना बाधित अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. त्या अधिकाऱ्यांनी स्वत:चा पदभार सांभळून संबंधीत अधिकाऱ्यांचा पदभार सांभाळावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.(Pune Police)

 

पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे पदभार सोपवण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव

1. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale)
यांचा पदभार पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांच्याकडे असणार आहे.

2. पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Naranware)
यांचा पदभार पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील (DCP Vivek Patil) यांच्याकडे

3. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil)
यांचा पदभार पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांच्याकडे

4. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad)
यांचा पदभार पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्याकडे असणार आहे.

 

Web Title :-  Pune Police | Symptoms of Corona to 4 senior officers (1 additional CP and 3 DCP) of Pune Police City Force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 35,756 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Deepika Padukone Viral Video | दीपिका पादुकोणनं बिना पॅन्टचा शेअर केला बोल्ड व्हिडिओ, अदा पाहून सोशल मीडियाचं वाढलं तापमान

 

Post Office IVR Service | जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये असेल एखादे अकाऊंट, तर ‘हा’ नंबर तुमच्या मोबाइलमध्ये आवश्यक करा सेव्ह; जाणून घ्या