Pune : डेक्कन परिसरातील VLCC वेलनेस अ‍ॅन्ड ब्युटी सेंटरवर पोलिसांकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन भागातील व्ही.एल.सी.सी वेलनेस अँड ब्युटी सेंटर या बड्या सलूनच्या दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शासकीय आदेशाचे उल्लंघन करून तो ग्राहकांची वेळ घेऊन त्यांना बोलवत असे.

याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात ब्युटी सेंटरचे मॅनेजर याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडारकर रस्त्यावर व्ही.एल.सी.सी वेलनेस अँड ब्युटी सेंटर आहे.

या सलून कोरोना काळात देखील सुरू असून, ग्राहकांची वेळ घेऊन त्यांना दुकानात बोलवत आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर या माहितीची खातरजमा करून या ब्युटी सेंटरवर छापा टाकला. यावेळी पोलिसांना आतमध्ये सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आले. अधिक चौकशीत ग्राहकांची वेळ घेत याठिकाणी सेवा पुरविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.