सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी या तडीपारीचे आदेश दिले आहेत.

सौरभ अरूण तिडके (वय 23, रा. नर्‍हे) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. सौरभ हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घातक शस्त्र बाळगून मारहाण करणे, तसेच वाहन चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचे कृत्ये थांबत नसल्याने त्याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्तांनी दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.