किराणा दुकानात सिगारेटची विक्री, पोलिसांचा छापा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात पान टपऱ्या बंद झाल्यानंतर किराणा दुकानातून गुटखा आणि सिगारेट जादा दराने केली जात असून, पुन्हा एका किराणा दुकानावर पोलिसांनी छापा मारला. त्याच्याकडून 41 हजार रुपयांची सिगारेट जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तांबोळी जनरल स्टोअर्सच्या चालकाविरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

लॉकडाऊन काळात शहरात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात चढ्या दराने विक्री होत आहे. त्यानुसार पोलीस कारवाई करत आहेत. खडकीतील तांबोळी जनरल स्टोअर्समध्ये सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तांबोळी दुकानात सिगारेटची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी येथे छापा टाकला. त्याच्यकडून ३९ हजार ५०० रुपयांची सिगारेट आणि १ हजार २०० रुपयांची रोकड असा मिळून ४१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, राजश्री मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, मनीषा पुकाळे, कोळगे, गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.