पुण्यात गॅस सिलेंडर ब्लॅकनं विकणार्‍यांवर छापा, 16 सिलेंडर जप्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गॅसचा साठा करून त्याची चढ्या दराने विक्री करण्यात होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला असून, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडगाव शेरी परिसरात छापा टाकून 16 गॅस जप्त करत एकावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच खडकीत अश्याच प्रकारे गॅसचा साठा पडण्यात आला होता.

अमित सुगधंचंद गोयल (वय 30, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नाव आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदी जाहिर करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू वगळता सर्व बंद केले आहे. तर नागरिकांना देखील घराच्या बाहेर पडण्यास मनाई आहे. याचाच फायदा घेऊन काही जण अत्यावश्यक वास्तुचा साठाकरून चढ्या दराने विक्री केली जात आहे. भाजीपाला महागला असताना गॅसही चढ्या भावात दिले जात आहेत. दरम्यान गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांना आपआपल्या हद्दीत गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अश्या प्रकारावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट चारचे पथक चंदननगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी उपनिरीक्षक विजय झंझाड व सहाय्यक उपनिरीक्षक अब्दूलकरीम सय्यद यांना माहिती मिळाली की, वडगाव शेरी भागात सागर पार्क लेनमध्ये भारत गॅस चा वितरक आदेश जुगारून 789 चा गॅस हा 1000 हजार रुपयांना विक्री करत आहे. त्यानुसार बनावट ग्राहक तयार करून ते अमित गॅस एजन्सी येथे पाठवून याबाबत खात्री केली असता तो चढ्या दराने विक्री करत असल्याचे समोर आले. त्यानुसार याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी 16 भरलेले गॅस, काही ग्राहकांचे कार्ड असा ऐकून 33 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गोयल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंझाड, विवेक सिसाळ, अब्दूलकरीम सय्यद, कर्मचारी सुरेंद्र साबळे, संदीप मुंढे, दीपक चव्हाण, मोहन वाळके यांच्या पथकाने केली आहे.