पुण्यात विनाकारण रस्त्यावर येणार्‍या 500 जणांवर पोलिसांकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउन शिथिल होताच रस्त्यावर सुसाट वाहने दिसू लागली होती. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यावर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली असून, दोन दिवसात 500 हुन अधिक जणांवर कारवाई केली आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे आणखीनच धोका वाढला. तर अनेकजण विनाकारण बाहेर फिरत असल्याचे दिसून आले. तसेच अनेकजण मास्क न वापरता बाहेर फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी गेल्या दोन दिवसात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

शहरात संचारबंदी लागू आहे. विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पण अनेकजण संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. त्यानुसार पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करुन बेशिस्तांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यासाठी ८५ अधिकारी आणि ३३७ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांकडून प्रतिबंधित क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विनाकारण भटकंती करणे, विना मास्क प्रवास करणे, ट्रीपल सीट, सिग्नल तोडणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असल्याचे दिसून आले आहे. त्यापाश्र्वभूमीवर शहरातील ९४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

दोन दिवसातील कारवाई
विनापरवानगी भटकंती करणे -६९
विनामास्क- १०२
संचारबंदीतील कारवाई-९७
वाहने जप्त- १७८
ट्रीपल सीट-१३१
सिग्नल तोडणे आणि विरुद्ध दिशेने प्रवास-१६७
कलम १८८ नुसार कारवाई-१८४
बेदरकारपणे वाहन चालविणे-५७