Pune News : आणखी एका टोळीवर मोक्कानुसार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  व्यापाऱ्याला मारहाण करून 4 लाखांचे दागिने लुटणाऱ्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान पुणे पोलिसांच्या मोक्का अन स्थानबद्ध कारवाईने मात्र गुन्हेगारात दहशत निर्माण झाली आहे.
टोळीप्रमुख गणेश काविश पवार (वय 19), कृष्णा बबन लोखंडे (वय 20), अजय भागवत घाडगे (वय 21) शुभम उमेश अबनावे (वय 21), गणेश दिपक रेणुसे (वय 21) प्रज्योत पांडुरंग भोसले (वय 21) अशी मोक्कानूसार कारवाई केलेल्याची नावे आहेत.

हडपसर परिसरात राहणारे 52 वर्षीय फिर्यादी हे 23 जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी आरोपींनी रस्त्यात गाडी आडवी का लावली ? गाडी जरा बाजुला घ्या असे म्हणत त्यांच्या मानेवर हाताने मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करत 6 जणांना अटक केली होती. दरम्यान आरोपींवर मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी तयारकरून पाठवला होता. त्यानुसार त्याला परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी मंजुरी देत पोलीस आयुक्त यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला. पोलीस आयुक्तांनी या 6 जणांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे.