Lockdown : पुण्यात दिवसभरात 1100 वाहने जप्त तर 650 जणांवर FIR दाखल

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील नागरिकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट दिसून येत आहे. एका दिवसात पोलिसांनी

642 जणांवर गुन्हे दाखल केले असून, 1123 वाहने जप्त केली आहेत.

कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनान विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. तरीही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यातही सकाळी व सायंकाळी नागरिक जास्त फिरत आहेत. शहरात कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे.

वाढता आकडेवारीनंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच नागरिक बाहेर पडणार नाहीत यासाठी कठोर पावले उचलण्याची सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी रविवारी एका दिवसात साडे तीन हजार कारवाई केली आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असून, नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

—चौकट—

मॉर्निंग वॉक– ३२२

188 नुसार केसेस–642

जप्त वाहने– 1123

144 नुसार नोटिसा– 1199

मास्क न घालता फिरणे– 305