लोकसभा निवडणूक : शहरात पोलिसांकडून पथसंचलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवरून पुणे पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय व राज्य राखीव दलाचे कर्मचारी यांनी पथसंचलन केले. रविवारी आणि सोमवारी शहरातील प्रमुख रस्ते, संवेदनशील ठिकाणी हे पथसंचलन घेण्यात आले.

सोमवारी पुणे पोलिसांनी लष्कर ते अल्का टॉकीजपर्यंत पथसंचलन करण्यात आले. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग आणि परिमंडल १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान आणि पुणे पोलिसांनी पथसंचलन केले. यात केंद्रीय निमलष्करी दलाच्या ५ कंपन्या, ५० अधिकारी, १५० जवान आणि २ क्यूआरटी पथकांनी सहभाग घेतला होता.

तर रविवारी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन केले. त्यात १७० अधिकारी कर्मचारी सहभागी होते. तर दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या पथसंचलनात १८६ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

बंडगार्डन पोलिसांनी ताडीवाला रोड, प्रायव्हेट रोड, जुना बाजार परिसरात पथसंचलन केले असून डेक्कन पोलिसांनी दुपारी पथसंचलन घेतले होते. विश्रांतवाडी पोलिसांनी लोहगाव, धानोरी जकात नाका परिसरात पथसंचलन घेतले.

फरासखाना पोलिसांनी शहराच्या मध्य वस्तीत सकाळी ११ वाजता पथसंचलन घेतले. त्यात १५० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. वारजे पोलिसांनी एन डी ए रोड, वारजे गावठाण, अतुलनगर परिसरात पथसंचलन केले.

pune-police.

Loading...
You might also like