Pune Police-Tarang 2023 | तरंग-2023 : पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police-Tarang 2023 | पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांचे संकल्पनेतुन पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती जनमानसातील सर्वसामान्य नागरिकांना अवगत व्हावी. तसेच पोलीस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांनी तरंग-2023 या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयाचे दिनांक 22/12/2023 ते दिनांक 24/12/2023 या कालावधीत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी सकाळी 11/00 ते रात्रौ 10/00 वा.पर्यंत आयोजन केले होते. (Pune Police-Tarang 2023)

सदर कार्यक्रम सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो/ व्हिडीओच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली. त्यामध्ये पोलीस दलातील भरोसा सेल, दामिनी पथक हे महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन यशस्वी कार्यरत आहेत. त्याप्रमाणे डायल 112, राज्य राखील बल, दळणवळण संदेश वाहन यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटकांची परिपुर्ण माहिती त्यांचे कामकाज याबद्दलची माहिती मेळावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना देण्यात आली. (Pune Police-Tarang 2023)

सांस्कृतिक कलेचा वारसा असणारे पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (Artison Gallery) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकार, मातीची भांडी कलाकृती, पर्यावरणपुरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांडयाचे प्रदर्शन, तसेच फुलेझाडे, रोपवाटीका, पुस्तक स्टॉल इत्यादिंचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञान प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार,व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच, बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात आले होते.

समाजातील सर्व घटकांचे या कालावधीत मनोरंजन व्हावे तसेच पोलिसांच्या कामकाजाची माहिती व्हावी आणि पोलीस
व जनता यांचेत सुसंवाद व्हावा या दृष्टीकोनातुन प्रयत्न करण्यात आले. तसेच वाद्यवृंद (ऑकेस्ट्रा) आणि
मराठी सिनसृष्टीतील हास्य कलाकार इतर सेलीबेट्री यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व मनोरंजनाबरोबरच खाद्य संस्कृतीचे ही स्टॉल प्रदर्शनात होते. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने,
देशी पदार्थ, कपडयाचे प्रदर्शन या विविध वस्तुंचे प्रदर्शन सदर मेळाव्या करीता पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकारी,
निमसरकारी अधिकारी, स्थानिक कलाकार आणि कल्पक व दर्जेदार कारागीर उपस्थित होते.

पोलीस घटकांशी संबंधित क्विक रिस्पॉन्स टिम डेमे, एस.आर.पी.एफ पाईप बॅडचे सादरीकरण, डॉग शो, किड्स झोन
पोलीस दलातील कलाकार यांनी सादर केलेल्या नृत्य गायन व पाचल वृंद यांनी केलेल्या कला व इतर कला,
गार्ड ऑफ ऑनर साठी महिली पोलीस अंमलदार यांनी त्यासंदर्भात केलेले सादरीकरण, किड्स झोन एरीया,
पोलीस सायन्स डोम अ‍ॅक्टीवीटी, नादब्रह्म ढोलताशा पथक यांचे सादरीकरण, प्रियदर्शनी शाळेचे ढोलताशा पथक
यांनी केलेले सादरीकरण, हॅड पॅन वादन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
(DyCM Devendra Fadnavis), उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil),
माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस (Former DGP Ajit Parasnis), पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड
विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey), अपर पोलीस महासंचालक निकेत कौशिक, माजी पोलीस महानिरीक्षक अविनाश पारधी, विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे (IPS Ashok Morale), उद्योजक पुनीत बालन
(Entrepreneur Punit Balan) सिनेकलाकार मिनाक्षी शेषाद्री, वैशाली जाधव, ऋतुजा जुन्नरकर, प्रिया बेर्डे,
मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), प्राजक्ता गायकवाड,
अमृता खानविलकर, तेजा देवकर, शर्वरी जमेनीस, राहुल बेलापुरकर, अमृता घोंगडे, गायक सलील कुलकर्णी
(Singer Salil Kulkarni) व त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी, कार्तिकी गायकवाड, अजित वस्पुरे, सुजीत सोमन,
अथर्व सुदामे, डॅनी पंडीत यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी या कार्यक्रमास भेट दिली. रेडिओ जॉकी आर.जे. संग्राम,
नयन जयप्रकाश, अक्षय बनकर, भाग्यश्री पालेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

तरंग-2023 या मेळाव्याला पुणेकर नागरीकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
पोलीस घटनांचे प्रदर्शन, कुशल कारागिर यांनी बनवलेल्या विविध वस्तु, खाद्य पदार्थ यांचा आस्वाद घेतला.
तसेच प्रदर्शनात पोलीस घटका विषयी लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रदर्शनाची माहिती घेतली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न, आता…”, रोहित पवारांचे वक्तव्य

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”