दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळींकडून आणखी 2 गुन्हयांची उकल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिंहगड रस्त्यावरील एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडलेल्या टोळीकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. बिबवेवाडीत दारु व्यवसायिकाला अडवून कोयत्याच्या धाकाने ५० हजारांची रोकड चोरली होती. तर एक मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

विकास गंगाराम राठोड (रा. धायरी गाव) प्रथमेश महादू येणपूरे (रा. दत्तनगर), अनिकेत शिवाजी घायतडक (हडपसर), आकाश अरुण पवार (रा. कात्रज), जिशान हबीब अन्सारी (रायगड) आणि योगेश रमेश जगधने (बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

चार दिवसांपुर्वी सिंहगड रस्त्यावर एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारील असलेल्या सहाजणांना पकडले होते. त्यांच्याकडे चौकशीत सुरू होती. त्यावेळी आठवड्यापुर्वी बिबवेवाडीतील एका देशी दारु व्यवसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून ७० हजारांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली. हल्लेखोरांनी गुन्हात वापरलेल्या तीन दुचाकी, कोयता, तलवार, सुरा मिळून २ लाख ४० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. त्यांच्याकडील जप्त केलेली एक दुचाकी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, दीपक मते, राहूल घाडगे, किशोर शिंदे, अनिल शिंदे, दत्तात्रय गरुड, संतोष क्षीरसागर, मच्छिंद्र वाळके, रोहिदास लवांडे, गजानन गाणबोटे, रामदास गोणते, मेहबूब मोकाशी, नितीन रावळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.