Pune Police | कंट्रोल रूमनं कॉल दिल्यानंतर खडक पोलिस ठाण्यातील ‘त्या’ मार्शलनं केलं भर पावसात कौतुकास्पद काम, जाणून घ्या

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  ‘वडील खूप त्रास देतात, जेवण करत नाहीत; जरा पोलिसांची भिती दाखवा’ म्हणत एका तरुणीने पुणे पोलिसांच्या (Pune Police) नियंत्रण कक्षाला (Control Room) फोन केला आणि पुणे पोलीसही (Pune Police) हे ऐकून काहीकाळ स्तब्ध झाले. पण, परिस्थिती लक्षात घेत नियंत्रण कक्षाने संबंधित मार्शलला घटनास्थळी पाठवलं आणि मार्शलनं देखील त्यांचं काम व्यवस्थितरित्या पार पाडलं.. पोलीस जाताच त्या तरुणीच्या वडिलांनी त्रास न देता जेवण तर केलं पण त्रास न देण्याचं वचनही दिलं. पुण्यात घडलेल्या या अनोख्या “कॉल”ची शहरात तुफान चर्चा होती. सोशल मीडियावर मार्शलनं नियंत्रण कक्षाशी केलेलं संभाषण व्हायरल झालं आहे.

पुण्यातील कासेवाडी भागात बुधवारी रात्री हा प्रसंग घडला आहे.
खडक पोलिसांच्या (Khadak Police) मार्शलनं भर पावसात घटनास्थळी धाव घेत त्या तरुणीला मदत केली आहे.
त्याच झालं असं, खडक पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याची मार्शल ड्युटी सुरू होती.
रात्री शहरात संततधार सुरू होती.
तितक्यात 9 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला.

एक तरुणी घाबरत घाबरत बोलली ‘अहो माझे वडील खूप त्रास देतात, जेवत नाहीत.
जरा पोलिसांची भिती दाखवता का’. आता रात्रीची वेळ व असा प्रसंग. पोलिसांनी देखील त्याची तात्काळ दखल घेत खडकाच्या मार्शलला कॉलची माहिती देऊन रवाना केले.
मार्शल येथे गेले. त्यावेळी तरुणीने वडील त्रास देतात. जेवण करा म्हणलं तरी जेवण देखील करत नाहीत.
तुम्ही जरा धाक दाखवा, अशी विनंतीवजा तक्रार केली.
मग, मार्शलवरील कर्मचाऱ्यांनी त्या आजोबांना दरडावत आणि गोडबोलत समजावून सांगितले.
मग त्यांनी जेवण तर केलेच पण आता कुटुंबाला त्रास देखील देणार नाही, असा विश्वास दिला.
त्यानंतर मार्शल पुन्हा पोलीस ठाण्याकडे रवाना झाले.
मार्शलने नियंत्रण कक्षाला कॉलची माहिती देऊन पूर्तता झाली असल्याचा निरोप दिला.

Web Title : Pune Police | That marshal from Khadak police station did an admirable job in the pouring rain, find out the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NCP Film Cultural Department | मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा द्या, राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाची मागणी

Pune Crime | पिंकी परीयालकडून 2 सोन्याचे बिस्कीट जप्त; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी