Pune Police | हद्दीत अवैध धंदे सुरु असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरणार

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी गुंड टोळ्यांच्या मुसक्या (Crime) आवळण्याबरोबरच आता शहरातील अवैध धंद्याना लक्ष्य केले आहे. पोलीस उपायुक्त मुख्यालय स्वप्ना गोरे (Deputy Commissioner of Police Swapna Gore) यांनी पोलीस आयुक्तांच्या सुचनेनुसार एका आदेश काढला आहे. त्यामुळे अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांना (Pune Police Officers) अल्टिमेटच दिला असल्याचे दिसत आहे. आता ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोठेही अवैध धंदे, जुगार, दारु अड्डे आढळून आल्यास त्याला सर्वस्वी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला (Senior Inspector) जबाबदार धरण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे येत्या दोन दिवसात आपल्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे धंदे सुरू नाहीत असे लेखी प्रमाणपत्र वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्तांमार्फत (Assistant Commissioner of Police) सादर करावे लागणार आहे.
हा आदेश शहरातील सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा (Crime Branch) आणि वाहतूक विभागातील (Traffic Department) पोलिस निरीक्षकांना लागू होणार आहे.

पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेत नामचिन टोळीचे दादा, सराईत गुन्हेगारांवर जरब बसवली आहे.
शहरातील मध्यवस्ती आणि उपनगर परिसरात अवैध धंद्याचा जोर अलिकडील काळात वाढला आहे.
अनेकदा गुन्हेगारीला अवैध धंद्यातून मिळणारी ‘रसद’ ही खतपाणी घालते.
शहरातील काही पोलीस ठाण्याची हद्द पुणे ग्रामिणला लागून आहे.
पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh) यांनी अवैध धद्यांवाल्यांच्या नाड्या आवळल्यानंतर अनेकांनी त्यांचं बस्तान शहरालगतच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बसविले आहे.
त्यातूनच प्रतिस्पर्धी गटातून संघर्ष निर्माण होतो आहे.

 

काय म्हटले आहे आदेशात…

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना प्रमाणपत्र लिहून द्यावे लागणार आहे . त्यामध्ये त्यांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी जुगार, दारू, मटका असे अवैध धंदे सुरू नाहीत.
व आढळून आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची राहणार आहे.
तसेच त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईस व्यक्तिशः ते जबाबदार राहणार आहेत.
तरी देखील कोणी चोरुन-लपून अवैध धंदे करीत असल्याची माहिती मिळून आल्यानंर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
असे लिहून द्यावे लागणार आहे. येत्या दोन दिवसात हे प्रमाणपत्र सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्फत सादर करावे लागणार आहे.

 

Web Title : Pune Police | The senior police inspector will be held responsible if illegal trades are started in the border

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडसह मुलावर सावकारीचा आणखी एक गुन्हा

Pimpri Crime | ‘माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तर… ‘ 26 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

Maharashtra Mantralaya | धक्कादायक ! मंत्रालयाच्या उपहारगृह परिसरात आढळल्या दारुच्या बाटल्या; खमंग चर्चेला उधाण