पुणे पोलिसांनी केली थेट कानपूरमध्ये कारवाई ! ATM फ्रॉडमधील आरोपीला अटक, विकास दुबे एन्काऊंटर मधील UP पोलिसांची साथ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –    एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये (ATM) तांत्रिक छेडछाड करुन लाखो रुपये काढून घेऊन बॅंकाना गंडवणा-या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कानपूर (उत्तर प्रदेश) येथून (police-took-direct-action-kanpur)अटक केली. विकास दुबे एन्काऊंटर मध्ये सहभागी असलेले पोलीस निरीक्षक शैलेंद्रसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने (help-vikas-dubey-encounter-police) पोलिसांनी आरोपीला पकडले. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली.

मुकेश यादव (रा. कानपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने यापूर्वी संदीपकुमार, अरविंदकुमार आणि अशोककुमार (तिघे रा. नऱ्हे) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेच्या हिंगणे खुर्द येथील एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये छेडछाड करुन 96 हजार रुपये काढले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली होती. संदीपकुमार याच्याकडे 58, अशोककुमार याच्याकडे 8 एटीएम कार्ड सापडली होती. त्याने ही कार्ड आपल्याला मुकेश यादवने दिल्याचे सांगितले होते. त्यानुसार पुणे पोलिसांचे पथक कानपूरला आले होते.

एटीएम कार्डचे कुरियर घेण्यासाठी तो येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक शैलेंद्रसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मुकेशला पकडले. मुकेश हा तेथील लोकांकडून एटीएम कार्ड घेऊन त्यांना दरमहा 5 हजार रुपये किंवा त्यांच्या खात्यात जेवढे पैसे येतील, त्याप्रमाणात टक्केवारी देत असे. ही कार्डे घेऊन तो पुण्यात येऊन संदीपकुमार यांना देत असत. संदीपकुमार हा त्या खात्यात आपल्याकडील 20 हजार रुपये टाकत व त्यातील 10 हजार रुपये काढून घेत. त्यानंतर पुढे पैसे काढताना तो मशीनमध्ये छेडछाड करीत व पैसे काढून घेत होते. मात्र, बँकेकडे अयशस्वी ट्रान्झक्शन अशी नोंद होत असत. त्यानंतर तो बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन पैसे मिळाले नसल्याचे सांगत होते. त्यानुसार बँक त्यांच्या खात्यात ते पैसे परत टाकत असे, अशाप्रकारे त्यांनी आतापर्यंत 17 लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.