Pune Police | सोशल मिडियाच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांवर पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – सोशल मीडिया (Social Media) हे सध्या कोणतीही गोष्ट विशिष्ट समुदायापर्यंत पोहचविण्याचे उत्तम माध्यम झाले आहे. या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याबरोबरच माहितीची देवाण-घेवाण, जागरुकतेचे संदेश देण्याचे कामही अनेक संस्था, संघटनांकडून केले जाते. यात पोलीसही मागे नाहीत. पुणे पोलीस (Pune Police) सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यां वाहनचालकांवर कारवाई करत आहेत. शहरात बेकायदा पार्किंग, अनोळखी किंवा संशयास्पद वाहन परिसरात निदर्शनास आल्यास नागरिकांना वाहतूक शाखेने ट्ठिटर, व्हॉटस्‌ॲप किंवा महाट्रॅफिक अ‍ॅपवर (Twitter, WhatsApp, Mahatraffic App) छायाचित्र पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या 6 महिन्यांत ट्विटरद्वारे आलेल्या तक्रारींवरून 297 तर व्हॉट्सॲपद्वारे आलेल्या तक्रारीवरून 272 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

लॉकडाउन हळूहळू शिथिल झाल्याने शहरातील रस्त्यांवर वाहतूक वाढली आहे. अशात नो पार्कींग’च्या (No parking) ठिकाणी वाहने उभी करणे, ट्रिपल सीट, हेल्मेट परिधान न करणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणे आणि सिग्नल तोडणे असे वाहतुक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाहनचालकांकडून होत आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेने सोशल मिडियाच्या माध्यमातून छायाचित्र पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहतूक पोलिसांनी महाट्रॅफीक ॲपवर (Mahatraffic App) आलेल्या 2 हजार 767 तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवलेे जात असून गेल्या 6 महिन्यांत एकूण 8 लाख 85 हजार 776 वाहनांवर कारवाई केली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा पोलिसांकडून कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती सतर्क नागरिकांनी व्हॉटस्‌ॲप, ट्विटर, महाट्रॅफिक ॲपद्वारे पोलिसांना द्यावी. त्यावरुन संबंधित वाहनचालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

सतर्क नागरिकांनी बेशिस्त वाहनचालकांची माहिती येथे द्यावी

ट्विटर : @PuneCityTraffic

फेसबुक : Pune Traffic Police

व्हॉटस्‌ॲप : 91- 84118 00100

ॲप : Maha Traffic app

Web Titel :- pune police | traffic branch of pune police will take action against violators through social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर