#CoupleChallenge : ‘… तर कपलचं खपल चॅलेंज होईल’, पुणे पोलिसांनी केले जबरदस्त ट्विट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाज माध्यमात बदलत्या काळानुसार सातत्याने काही ना काही ट्रेंड होत असतात. आता असाच एक #CoupleChallenge नावाचा ट्रेंड समाज माध्यमात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या ट्रेंड मध्ये प्रेमी, युगुल, दांपत्य आपल्या जोडीदारासोबत फोटो शेअर करताना दिसत आहे. काही जण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी फोटो पोस्ट करणाऱ्यांना सावधान करत फोटो शेअर न करण्याचं आवाहन करणार भन्नाट असे ट्विट केलं आहे.

पुणे पोलिसांनी ट्विट करत फोटो शेअर करणाऱ्यांना असं करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा असे सांगत जागरुक राहण्याचं आवाहन केलं आहे. नाहीतर कपिलचा खपलं चॅलेंज होईल, अशा शब्दांत इशारा देखील दिला आहे.

ट्विट करत पुणे पोलिसांनी सांगितलं की, आपल्या जोडीदारासोबत फोटो पोस्ट करताना दोन वेळा विचार करा. गोड वाटणार चॅलेंज काळजी नाही घेतली तर चुकीचं ठरू शकते. तसेच ट्विट मध्ये एक फोटो शेअर करत त्यात लिहलं आहे की, ‘कपल चॅलेंज वाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपलं चॅलेंज होईल’.

पोलिसांनी ट्विट मध्ये फोटो पोस्ट करत काय धोका आहे हे सुद्धा सांगितलं आहे. आपण केलेलं फोटो मॉर्फिंग, पॉर्न आणि इतर क्राईम गुन्ह्यासाठी वापरली जावू शकतात. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like