Pune Police Tweet | ‘जर बनायचं असेल ऑनलाईन सौद्यांचा “सरदार”, तर…,’; पुणे पोलिसांचं Tweet सोशल मीडियावर व्हायरल

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन पुणे पोलिसांचं Twitter अकाऊंट चांगलचं अ‍ॅक्टिव्ह आहे. पुणे पोलिसांकडून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या भन्नाट उत्तराचे ट्विट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असते. सध्या असेच एक पुणे पोलिसांचे ट्विट (Pune Police Tweet) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनुराग कश्यपचा सिनेमा गँग्स ऑफ वासेपुर (Gangs of Wasseypur) सिनेमातील एक डॉयलॉगचा आधार घेऊन पुणे पोलिसांनी हे ट्विट (Pune Police Tweet) केलं आहे. पुणे शहर पोलिसांकडून जनजागृती (Awareness) करण्यासाठी या सिनेमातील डॉयलॉगच्या मिम्सचा वापर केला आहे. pune police tweet warn people against cybercrime using gangs of wasseypur popular memes

गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता.
या चित्रपटातील एका सिनवर अतिशय लोकप्रिय मिम्स तयार करण्यात आले आहेत.
याचाच आधार घेऊन पुणे शहर पोलिसांनी ऑनलाईन घोटाळ्यासंदर्भात जनजागृती करणारे ट्विट केलं आहे.

गँग्स ऑफ वासेपुर चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ‘Chaabi kaha hai ?’ (चावी कुठे आहे ?) असं ट्विट करुन पुणे पोलिसांनी नागरिकांना एक प्रकारचा इशारा दिला आहे.
स्वस्त किंमतीत दुचाकी वाहनांसारख्या वस्तू विकणाऱ्या काही विशिष्ट वेबसाईटवर असत्यापित यादीमध्ये न पडण्याचा इशारा पुणे शहर पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून पुणेकरांना देण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणे शहर पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, #Cyber Victim to #Fraudster after paying advance for a Scooty listed OLX/Quikr at ‘Half the price’ जर बनायचे असेल ऑनलाईन सौद्यांचा ‘सरदार’… तर OLX/Quikr विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळून करा व्यवहार ! असे ट्विट करुन फसवणूक करणाऱ्याविरुद्ध जनजागृती करण्याच्या मोहिमेत पोलिसांनी नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न या ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

Web Title : pune police tweet warn people against cybercrime using gangs of wasseypur popular memes

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षकांना ऑनलाइन क्लास सुरू असताना शिवीगाळ; कोंढवा पोलीस ठाण्यात

Pandharpur curfew । 17 ते 25 जुलै पंढरपुरात संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Pregnant Women Problems | गरोदरपणात रक्ताच्या उलट्या का होतात? कारणे आणि घरगुती उपचार जाणून घ्या

Pune Crime News | पुण्याच्या रामवाडी परिसरात वाहने अडवुन चालकांना मारहाण; दोघांना अटक