नंबर प्लेटवर लिहीलं होतं ‘खानसाब’, पुणे पोलिसांनी केलं ‘हे’ ट्विट, झालं तात्काळ ‘व्हायरल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवर असे काही ट्विट असतात की पाहणारे कमेंट केल्याशिवाय राहू शकत नाहीत. हे ट्विट लोकांना खुश देखील करत आणि महत्वाची गोष्ट देखील सांगून जातात. एकाने फोटो ट्विटकरात म्हंटले होते की, खानसाहेब बिना हेल्मेट फॅन्सी नंबर प्लेट लावून गाडी चालवत आहेत यांच्यावर जरूर कारवाई करा. याला उत्तर देत पोलिसांनी देखील एक ट्विट केले आहे.

https://twitter.com/Chandra75615686/status/1222019436665696256

यानंतर पुणे पोलिसांनी केलेले ट्विट इतके व्हायरल झाले की, त्यावर एका पाठोपाठ एक अशा अनेक कमेंट येऊ लागल्या. ट्विटमध्ये लिहिण्यात आले आहे की, खान साहेब यांना कुल देखील दिसायचे आहे, हेअर स्टाईल देखील दाखवायची आहे, हिरो वाली बाईक देखील चालवायची आहे. परंतु खानसाहेब यांना ट्राफिक रुल फॉलो करायचे नाहीत असे कसे चालेल खान साहेब.

त्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. एक जण लिहितो, मला हसू आवरत नाही, कितीची पावती फाडली सर हे देखील ट्विट करायला हवे होते. बिचारा नवाब बनत होता एका फोटोने नवाबाच्या सगळी गेली.

पुणे पोलिसांच्या ट्विटला आतापर्यंत बरेच लाईक्स आणि 2 हजाराहून अधिक कमेंट आल्या आहेत. अनेकांनी पुणे पोलिसांच्या या ट्विटचे कौतुकही केले.

हे पाहिल्यानंतर दुसर्‍या युजरने दुचाकी चालकाचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, सर छावा भाईंनाही धडा शिकवा.