Pune Police | 12 वर्षानंतर परदेशातून आलेली महिला सुखरुप घरी, पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | खाकी वर्दीतील बदनाम झालेल्या पोलिसांमध्ये ड्युटीच्या पलिकडील संवेदनशील माणुसकी असते याची प्रचिती पुण्यात आली. पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttamnagar Police Station) हद्दीत बुधवारी (दि.7) विमनस्क अवस्थेत एक महिला मार्शलला आढळून आली. पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाषेची अडचण (Language Difficulty) आल्यामुळे महिलेची माहिती मिळण्यास अडचण येत होती. अखेर यावर मात करत दत्तवाडी पोलिसांनी (Pune Police) महिलेच्या कुटुंबाशी संपर्क करुन महिलेला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले.

विमनस्क अवस्थेत आढळून आलेल्या महिलेला केवळ तेलगु (Telugu) आणि अरेबिक भाषा (Arabic Languages) येत असल्याने पोलिसांना (Pune Police) तिच्याशी संवाद साधता येत नव्हता. अखेर दहशतवाद विरोधी पथकाचे (Anti-Terrorism Squad) पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (PSI Suresh Jaibhai) व तपास पथकाचे अधिकारी उमेश रोकडे (Umesh Rokde) यांनी सैन्य पोलीस दलातील (Military Police Force) रवी कटुला (Ravi Katula) व मुमताज समीर कुरेशी (Mumtaz Sameer Qureshi) यांना बोलावून घेतले. त्यांच्यामर्फत चौकशी केली असता महिलेने तिचे नाव नागमणी लक्ष्मैया वल्लुरी Nagamani Lakshmaiya Valluri (वय-55 रा. कुवेत -Kuwait मुळ रा. मसापेठ जि. कडप्पा, राज्य आंध्रप्रदेश-Andhra Pradesh) असल्याची माहिती मिळाली.

ही महिला कुवेत देशात काम करत असून तब्बल 12 वर्षानंतर ती भारतात परत आली. मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) उतल्यानंतर कुठे जायचे हे समजत नसल्याने ती रेल्वेने चेन्नई येथे गेली. तिथून पुण्यात उत्तमनगर परिसरात आली. तिच्याकडे घरातील कोणत्याही व्यक्तीचा फोन नंबर नसल्याने पोलिसांनी तिच्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण करुन तिचा मुलगा सिवाप्रकाश (Sivaprakash) याचा नंबर मिळवला. उत्तमनगर पोलिसांनी मुलाला संपर्क साधून महिलेबाबत सांगितले. महिलेच्या मुलाने त्याचा मामेभाऊ बी. वरा प्रसाद याला उत्तमनगर पोलिस ठाण्यात पाठवतो असे सांगितले.

दरम्यान, महिलेला सांभाळण्याची जबाबदारी ममताज समीर कुरेश यांनी घेतली. आज (गुरुवार) सकाळी बी वरा प्रसाद हे पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी महिलेला त्यांच्या ताब्यात दिले. उत्तमनगर पोलिसांनी कौशल्याने तपास करुन 12 वर्षानंतर भारतात आलेल्या महिलेला तिच्या कुटुंबाची भेट घडवून आणली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (API Rukmini Galande), उत्तमनगर पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior Police Inspector Sunil Jaitapurkar) यांच्या
मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी उमेश रोकडे यांनी केली.

Web Title :- Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Treatment | पायांची शायनिंग वाढवण्याची आश्चर्यकारक पद्धत, घरीच घालवा’ हे’ काळे डाग

Yakub Memon Grave | याकूब मेमन कबरीवरुन राजकारण तापलं ! मग तुम्ही दाऊदला समर्थन करता का?, भाजपच्या आरोपांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

CM Eknath Shinde | शिवसेना भवनाजवळच एकनाथ शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय