Pune : शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवरील पोलिसाचा स्वतः वर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न, वाचवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला गोळी लागल्याने खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांने स्वतः वर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज पहाटे हा प्रकार घडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ड्युटीवर असताना महिला कर्मचाऱ्याशी वाद झाल्यानंतर मानसिक तणावातून हा प्रकार घडला आल्याचे सांगण्यात येते.

पोलीस कॉन्स्टेबल बेंडाळे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंडाळे आणि पोलीस शिपाई सस्ते हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत. क्वार्टर गेट येथे ते सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीस ड्युटीवर होते. यावेळी सस्ते व महिला कर्मचारी यांच्यात वाद झाले. वादात सस्ते याना मानसिक ताण आली त्यांनी स्वतःवर गोळी गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार लक्षात येताच बेंडाळे यांनी त्यांना अडविले. अडवत असताना गोळी बेंडाळे याना लागली आहे. यात बेंडाळे जखमी झाले असून, त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. माहिती मिळताच शिवाजीनगर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोपणर यांनी धाव घेतली. नेमकी गोळी स्वतःवर झाडून घेण्याचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.