Pune : ‘कोरोना’मुळं पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. शहर पोलीस दलातील कोरोनामुळे हा 9 बळी गेला आहे.

पांडुरंग घुले (वय 56) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग घुले हे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. त्यांची नेमणुक येरवडा वाहतूक विभागात होती. दरम्यान त्यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. 24 सप्टेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यांना प्लाझ्मा देऊन उपचार करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु दुर्दैवाने आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

दरम्यान शहर पोलीस दलातील कोरोना संसर्ग होऊन नववा बळी गेला आहे. यापूर्वी 8 जनांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात जवळपास दीड हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.